भतरेताणम

आठवणीतील गाण्यांसह रंगपंचमीचे इंद्रधनुष्य 🌈
🔥 शतकाच्या यज्ञांतुन, उठली एक *केशरी* ज्वाला दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला. 🔴 ही *गुलाबी* हवा, वेड लावी जीवा हाय श्वासातही, ऐकू ये मारवा का कुणी रंग हे उधळले अंबरी भान हरपून मी कावरीबावरी का कळेना तरी बोलतो पारवा ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा.. 🟡 अजून तुझे हळदीचे, अंग अंग *पिवळे* ग अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग मेंदीच्या पानावर, मन अजून झुलते ग ⚫ *काळ्या* मातीत मातीत, तिफण चालते वीज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो 💜 गडद *जांभळ* भरलं आभाळ मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ ❇️ *हिरवा* निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, धुंद व्हा रे 🟧 अजून थांब, लागली जगास झोप आंधळी दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी तुलामला विचारुनी फुटेल आज *तांबडे* उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे 💙 पंढरपूरीचा *निळा* लावण्याचा पुतळा! विठा देखियेला डोळां, बाईये वो !! 🤍 आनंदून रंगून विसरुन देहभान मोहरली सारी काया,हरपली मोहमाया कुडी चिडून पाजळून, प्राणज्योती मेळवून एक होऊ या, हा हा ! लखलख *चंदेरी* तेजाची, न्यारी दुनिया 🌈🌈 ======================== नमस्कार मंडळी, काल तुमच्याकडे अनेक फुले ( हसरी 🌼 ) जमा झाली असतील. ही सगळी फुलं एकत्र करा, मनाच्या कोप-यात एक खड्डा खणून त्यात ते निर्माल्य खत म्हणून घाला, त्यात तुम्हाला आवडत्या *रंगाच्या* फुलाचे बी पेरा ( 🌺🌸🌹🌷🌻) , त्यावर निरागसतेची माती घाला, आणी रोज दिवसभरात एकदा त्या कप्प्याला भेट द्या आणी बघा वर्षभरात ते झाडं आणि तुमचं मन तुमच्या अवडत्या *रंगात* कसं फुलत ते रंग-पंचमीच्या शुभेच्छा 🙏🏼 📝 अमोल ०२/०४/२१ #रंगूनी_रंगात_सा-या_रंग_माझा_वेगळा

Comments